महाराष्ट्रात वेगवेगळे विचित्र प्रकार समोर येत असताना अशीच एक घटना बीड जिल्ह्यात पाटोदा येथे समोर आलेली आहे. एका लग्न समारंभात व्हिडिओ शूटिंग आणि फोटो काढून गावी परतत असता परतत असताना फोटोग्राफर लघुशंकेसाठी गेलेला असताना हीच वेळ साधत दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी कॅमेरा असलेली एक बॅग लंपास केली. सदर घटना 21 एप्रिल रोजी दुपारी पावणे एकच्या सुमारास बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात निर्गुडी येथे घडलेली आहे.
शुभम जालिंदर शेळके ( राहणार टाकळवाडी तालुका शिरूर ) हा फोटोग्राफीचा व्यवसाय करत असून 21 एप्रिल रोजी सकाळी सहकारी मनोज पवळ ( राहणार चुंबळी तालुका पाटोदा ) याच्यासोबत तो बीड येथे एका लग्नसमारंभासाठी गेला होता. लग्न समारंभाची फोटोग्राफी उरकल्यानंतर गावी जात असताना डोंगर किन्ही मार्गे राया मोहाकडे जाताना निरगुडी जवळील एका ढाब्याजवळ त्यांनी दुचाकी थांबवली आणि लघुशंकेसाठी ते उतरले.
दुसऱ्या एका दुचाकीवर याच वेळी एका व्यक्तीने कॅमेराची बॅग घेऊन पलायन केले. तब्बल 65 हजार रुपयांचा माल या बॅगमध्ये होता असे फिर्यादी यांचे म्हणणे असून पाटोदा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. हवालदार गोरख मिसाळ हे पुढील तपास करत आहेत .