महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे बाबासाहेब पुरंदरे यांचा वारंवार समर्थन करत असल्याचे दिसून येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांची पुरंदरे यांनी नेहमीच बदनामी केलेली आहे. जेम्स लेन याचा ब्रेन पुरंदरे हेच होते त्यामुळे ठाकरे यांनी शिवरायांच्या पुतळ्यासमोर नाक घासून माफी मागावी अशी मागणी इतिहासाचे अभ्यासक डॉक्टर श्रीमंत कोकाटे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली आहे.
औरंगाबाद येथे आले असता डॉक्टर कोकाटे म्हणाले की, ‘ प्रत्येक लेखनात पुरंदरे यांनी आपला विकृतपणा दाखवलेला आहे. जेम्स लेनचा सहलेखक श्रीकांत बहुलकर याला पुण्यातील शिवप्रेमींनी काळ फासल तेव्हा राज ठाकरे यांनी बहुलकरच्या घरी जाऊन त्याची माफी मागून त्याला अभय दिलं होतं म्हणजे एक प्रकारे जेम्स लेन याला मदत करणाऱ्यांना ठाकरे यांनी मदत केलेली आहे. वेळ पडली तर त्याचे पुरावे देण्याची देखील आपली तयारी आहे ,’ असेही कोकाटे म्हणाले.
कोकाटे पुढे म्हणाले की, ‘ पुरंदरेच्या मृत्यूनंतर विद्यमान आघाडी सरकारने शासकीय इतमामात त्यांचा अंत्यविधी केला. शिवरायांच्या सन्मानासाठी रस्त्यावर उतरणारे न्यायमूर्ती पी बी सावंत, स्वातंत्र्यसेनानी हौसाक्का पाटील यांचे निधन झाले त्यावेळी मात्र आघाडी सरकार त्यांच्या अंत्यविधीकडे देखील फिरकले नाही. फडणवीस सरकार आणि आघाडी सरकार यांच्यात वैचारिक काहीच फरक दिसत नाही हे बाबासाहेब पुरंदरे यांच्या श्रद्धांजली वरून स्पष्ट होते. भाजप आणि आघाडीसरकारची आयडॉलोजी सेम आहे, ‘ असेही ते पुढे म्हणाले
1 मे रोजी राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे सभा असून त्यांच्या सभेला काहीही विरोध नाही. संविधानानुसार प्रत्येकाला आपले विचार मांडण्याची स्वातंत्र्य आहे. राज ठाकरे यांनी माफी मागितली नाही तरी लोकशाही मार्गाने त्यांचा विरोध सुरूच राहील असेही कोकाटे यांनी म्हटलेले आहे