लग्न होण्याआधीच पुणेकराने डॉक्टर महिलेला लुबाडले , आता प्रकरण पोलिसात

Spread the love

पुण्यासह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी फसवणुकीच्या घटना उघडकीला येत असून त्यात ‘मॅरेज रॅकेट ‘ हा देखील प्रकार मोठ्या प्रमाणात राज्यात सुरु आहे. अशीच एक घटना पुण्यात उघडकीला आले असून शादी डॉट कॉम या वेबसाईटवर नाव रजिस्टर केल्यावर ओळख झाल्यानंतर तरुणीच्या घरी जाऊन स्थळ पाहण्यात आले. लग्नाची बोलणी देखील झाली आणि त्यानंतर एक स्वयंसेवी संस्था काढणार आहोत असे सांगत पाच लाख 93 हजार रुपये घेतले आणि फसवणूक केली अशी तक्रार कोल्हापुरातील शाहूपुरी पोलिसात दाखल झालेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार डॉक्टर दीपा शशिकांत गवंडी ( राहणार शिवशक्ती कॉलनी गोळीबार मैदान कसबा बावडा ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विकास रघुनाथ बांदल ( राहणार गोकुळ नगर गंगोत्री हॉटेल जवळ कात्रज पुणे) व राघव उर्फ विलास पाटील ( राहणार पुणे ) या संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दीपा गवंडी या सामुदायिक आरोग्य अधिकारी म्हणून काम करतात. लग्न जमावणाऱ्या एका वेबसाइटवरून त्यांची आणि संशयित विकास बांदल यांची ओळख झाली होती. त्यानंतर बांदल व त्याचा मित्र राघव पाटील हे दोघेही कसबा बावडा येथे डॉक्टर दीपा यांना भेटण्यासाठी आले त्यावेळी स्थळ पसंत असल्याचे सांगून लग्नाची बोलणी करत त्यांनी लग्न देखील ठरवले.

आम्ही तिरुपती कार्पोरेशन अँड जीवन संजीवनी नावाची स्वयंसेवी संस्था चालवतो असे त्यांनी दीपा यांना सांगितले आणि आणि त्यानंतर दीपा यांच्या मदतीने गणेश कॉलनी गोळीबार मैदान येथे सुनील जाधव यांचे घर भाड्याने घेऊन संस्थेचे कार्यालय सुरू केले. या कार्यालयात कोरोनामध्ये मृत्यू झालेल्या लोकांच्या नातेवाईकांना 50 हजारांचे अनुदान मिळवून देतो असे देखील सांगत त्यांनी अनेक जणांचे अर्ज देखील भरून घेतले मात्र आपली फसवणूक केली असे दीपा यांचे म्हणणे आहे.


Spread the love