‘ दुःख पाठ सोडेना मात्र आता थकलोय ‘, पोलीस कर्मचाऱ्याचे टोकाचे पाऊल

Spread the love

महाराष्ट्रात पोलीस दलावर असलेला तणाव ही काही नवीन बाब राहिलेली नाही. ड्युटीचे कुठलेच तास पक्के नसतात आणि त्यात वेगवेगळ्या राजकीय पक्षांची आंदोलने यामुळे पोलीस दलावर मोठा भार पडतो आहे त्यातून आत्महत्या देखील घटना घडलेल्या असून आता एक नवीन घटना नागपूर येथे उघडकीला आली आहे. शहर पोलीस दलातील कर्मचारी किरण अशोकराव सलामे ( वय 30 ) याने त्यांच्या सरकारी निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

उपलब्ध माहितीनुसारमी किरण सलामे 2014 साली शहर पोलीस दलात रुजू झालेला होता. धरमपेठ परिसरातील पोलिस वसाहतीत आई आणि छोट्या भावासह तो राहत होता. छोटा भाऊ हा खाजगी कंपनी खाजगी ठिकाणी काम करतो. शनिवारी किरण याची सुट्टी होती त्यामुळे तो संध्याकाळी घराबाहेर पडला आणि रात्री साडेदहाच्या सुमारास घरी परतला आणि बाजूच्या रिकाम्या क्वार्टरमध्ये झोपायला गेला. रविवारी सकाळी आईने आवाज दिला नंतर तो प्रतिसाद देत नसल्याने आईने शेजाऱ्यांना सांगितले.

शेजारच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी वरच्या भागातून डोकावले असता किरणने गळफास घेतल्याचे दिसून आले आणि या प्रकरणी पोलिसांना खबर देण्यात आली. सीताबर्डीचे पोलिस निरीक्षक अमोल काचोरे ांनी आपल्या सहकार्‍यांसह घटनास्थळी धाव घेतली.

किरणने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवलेली असून आतापर्यंत केलेल्या संघर्षाचा उल्लेख केलेला आहे त्यामध्ये अनेक संकटावर मात करत आपण इथपर्यंत पोहोचलो मात्र दुःख पाठ सोडायला तयार नाही एक गेले की दुसरे असते त्यामुळे आपण आता थकलो आहे, असे म्हणत काही व्यक्तिगत कारणांचा उल्लेख केला आहे आणि आत्महत्येसाठी कुणाला जबाबदार धरू नये असे देखील लिहून ठेवले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार वर्धा जिल्ह्यातील एका तरुणीसोबत किरण याचे लग्न जुळले होते. जूनमध्ये लग्नाची तारीख काढण्यात आली होती मात्र काही कारणांनी हे लग्न मोडले आणि त्या तरुणीचे चंद्रपूर जिल्ह्यात दुसरा एका तरुणाशी लग्न झाले त्यामुळे किरण नैराश्यात गेलेला होता त्यातूनच त्याने हा प्रकार केल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसून येत आहे.


Spread the love