महिलेसमोर रेल्वेत सलवारची नाडी सोडणारा ‘ तो ‘ तृतीयपंथी धरला , काय आहे प्रकरण ?

Spread the love

महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना मुंबई येथे समोर आलेली असून पस्तीस वर्षाच्या महिलेसमोर स्वतःच्या सलवारची नाडी सोडत एका तृतीयपंथी व्यक्तीने अश्लील चाळे करून त्या महिलेचा विनयभंग केला आणि बंदुकीचा धाक दाखवत तिच्याकडील सर्व पैसे हिसकावून चक्क तिच्या ब्लाउजमध्ये हात घालण्याचा किळसवाणा प्रकार विरार लोकल मध्ये केला. गुरुवारी पहाटे ही घटना घडली होती त्यानंतर बोरीवली रेल्वे पोलिसांनी खार येथील रहिवासी असलेला प्रफुल्ल उर्फ अभिषेक उर्फ सानिया बाळकृष्ण पांचाळ ( वय पंचवीस ) याला अवघ्या चोवीस तासात बेड्या ठोकल्या आहेत.

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटना घडली त्यावेळी डब्यात फक्त चार महिला होत्या. पीडित महिला ही भिवंडी येथील रहिवासी असून ती फुलं विक्रीचा व्यवसाय करते. वसईला जाण्यासाठी दादर येथे फलाटावर असलेल्या ट्रेनमध्ये ती बसली आणि आरोपी पांचाळ हा काही कालावधीत दुसऱ्या एका स्टेशन वरून डब्यात शिरला. मद्यधुंद अवस्थेत तो असल्याने पीडित महिलेच्या समोरील सीटवर येऊन बसला आणि त्यांनी सलवार फेडत अश्लील चाळे करत खांद्याला अडकवलेल्या एका बॅगेतली बंदुक काढली आणि महिलेला धमकावत पैशाची मागणी केली.

आपल्या सोबत घडलेल्या या धक्कादायक प्रकारानंतर महिला घाबरून गेली आणि तिने पर्स मधून चार हजार रुपये काढून पांचाळ याला दिले. त्यानंतर रेल्वे बोरिवलीला पोहोचली तेव्हा रेल्वे रुळावर उडी मारत पुन्हा तो दुसऱ्या एका रेल्वेमध्ये चढला महिलेने तक्रार नोंदविल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करत आरोपीची ओळख पटवली आणि अवघ्या चोवीस तासात त्याच्या मुसक्या आवळल्या. बोरीवली रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार तपासाची सूत्रे हलली होती.


Spread the love