महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना उघडकीला आली असून पोलिस कर्मचाऱ्याने हुंड्यासाठी पत्नीला मारझोड केली तसेच सासरच्या लोकांनी देखील विवाहित महिलेला तु आम्हाला पसंत नसल्याचे सांगत नोंदवण्यास नकार दिला. सदर महिलेने महिला तक्रार निवारण केंद्रात समेट घडवली मात्र त्यानंतरही सासरचा जाच त्रास सुरू होता त्यामुळे विवाहितेने अखेर बुलढाणा शहर पोलिसात पतीसह सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेल्या विशाल झिने याच्यासोबत फिर्यादी यांचे 5 डिसेंबर 2019 रोजी लग्न झाले होते. त्यानंतर पती विशाल झिने, सासरा अनिल झिने, सासु सुनिता झिने, आकाश झिने, ननंद सुषमा दीपक खिल्लारे, तिचा पती दीपक खिल्लारे, निर्मला खिल्लारे यांनी पत्नी कोमल हिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. लग्न ठरल्या वेळी सात लाख रुपये हुंडा देण्याचे ठरले होते मात्र विशाल मुंबईत नोकरी करत असल्याने ती त्याच्यासोबत मुंबईला गेली होती. दोन ते तीन महिने त्याने तिला व्यवस्थित वागवले मात्र त्यानंतर हुंड्यासाठी तिचा छळ करण्यास सुरु केले.
पीडितेच्या म्हणण्यानुसार पती विशाल झिने याने तू माझ्यासोबत आत्ताच आलीस आणि इतके लवकर तू गर्भवती कशी राहिली असे म्हणत तिच्या चारित्र्यावर देखील संशय घेतला आणि आणि तुझ्या पोटात मूल माझे नाही असे सांगत देखील त्याने तिला मारहाण केली. पीडित विवाहिता माहेरी आईकडे आली आणि त्यानंतर 20 ऑक्टोबरला मुलीचा जन्म झाल्यावर तिला भेटण्यासाठी सासरची मंडळी देखील आली नाही. बाळंतपणात मुलीचा मृत्यू झाला तरीदेखील पतीसह सासरच्यांनी आपल्याकडे पाहिले देखील नाही असे देखील पीडितेचे म्हणणे आहे.