महाराष्ट्रातील ‘ त्या ‘ शाळेत नक्की काय घडलंय ? मुख्याध्यापक फरार तर इतर मुली म्हणतात की ?

Spread the love

महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना रत्नागिरी जिल्ह्यात उघडकीला आली असून नातीच्या वयाची असलेल्या एका सहावी मधील शिकत असलेल्या मुलीसोबत शाळेच्या मुख्याध्यापकाने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार लांजा तालुक्यातील गव्हाणे इथे उघडकीला आलेला आहे. शाळेच्या मुख्याध्यापकावर लांजा पोलीस स्थानकात कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आलेला असून सदर प्रकारानंतर मुख्याध्यापक फरार झालेला आहे तर आता आणखी सहा मुलींनी देखील आता आपल्यासोबत देखील असाच प्रकार केला असल्याचे सांगितले आहे .

उपलब्ध माहितीनुसार, गव्हाणे येथील एका शाळेत पीडित विद्यार्थिनी सहावीमध्ये शिकते त्यावेळी शाळेच्या मुख्याध्यापकाने आपल्या दालनात बोलावून तोंडी परीक्षेचा बहाना करत तिच्या मनामध्ये लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले त्यानंतर पीडित विद्यार्थिनी अनेक दिवस शाळेत गेली नाही आणि आपण कुणाला सांगितले तर मुख्याध्यापक नापास करतील म्हणून ती कुणालाच काही बोलत नव्हती आणि सतत मानसिक दडपणाखाली वावरत होती. तिच्या वागण्यात आणि बोलण्यात झालेला बदल पाहता ती दडपणाखाली असल्याचे तिच्या घरच्यांच्या लक्षात आले आणि अखेर त्यांनी तिला बोलते केले.

पीडित मुलीने त्यावेळी आपल्यासोबत झालेल्या या प्रकाराची कुटुंबीयांना माहिती दिली आणि पालकांनी शाळा व्यवस्थापन समिती तसेच इतर गावातील मंडळींना माहिती दिली दिल्यानंतर गावच्या मंदिरात एक गाव बैठक घेण्यात आली आणि त्यानंतर सदर प्रकरण पोलिसात पोहोचले. पोलिसात प्रकरण पोहोचल्याचे समजताच मुख्याध्यापक फरार झालेला असून त्याच्याविरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.


Spread the love