महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून अनेक वेगवेगळ्या घटना उघडकीला येत असताना अशीच एक घटना अमरावती जिल्ह्यात समोर आलेली आहे. दिव्यांग मुलाच्या विवाहासाठी उपवर अशी मुलगी आहे मात्र ती गरीब घरचे असल्याने तिला लग्नासाठी दीड लाख रुपये द्यावे लागतील अशी बतावणी करत एका वर पित्याला दीड लाख रुपयांना फसवण्यात आले. लग्न झाल्यानंतर अवघ्या दोन तासात दीड लाख रुपये मिळाल्यानंतर ही बनावट नवरी फरार झाली. 22 एप्रिल रोजी संध्याकाळी सात वाजता हे लग्न झाले होते त्यानंतर अवघ्या दोन तासात या नवरीने पळ काढला.
सदर प्रकरणी वरपिता यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी असलम मिया शेरू मिया ( वय 50 राहणार बेगम बाग कॉलनी उज्जैन मध्य प्रदेश ), हर्षद दीपक अलोने ( वय 30 कृषी कॉलनी अमरावती ) आणि दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हर्षद अलोने याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत .
फिर्यादी असलेले वरपिता राजेश कथूनिया हे मध्यप्रदेश येथील रहिवासी आहेत तेथून राजेश यांचा मुलगा दिव्यांग आहे आणि त्याला रतलाम येथे लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याने त्यांनी परिचयाचा असलम मिया याच्याकडे लग्नासाठी मुलगी हवी म्हणून शब्द टाकला होता त्यावेळी असलम याने मुलगी आहे मात्र ती गरीब घरची आहे म्हणून दीड लाख रुपये द्यावे लागतील असे सुचवले त्यानंतर राजेश तेथून मुलासह अमरावती येथे आले होते.
अमरावतीत आल्यानंतर असलम मिया याने हर्षदा अलोने याच्या सोबत फिर्यादी यांची ओळख करून दिली आणि हर्षद याच्या ओळखीतून 22 एप्रिल रोजी खंडेलवालनगर येथे तेथून फिर्यादी यांचा मुलगा आणि तोतया नवरी यांचा विवाह करण्यात आला त्यानंतर राजेश यांनी नव्या नवरीच्या हातात दीड लाख रुपये दिले आणि ही रक्कम मी आईच्या बँक खात्यात ट्रान्सफर करून येते अशी बतावणी करत अवघ्या दोन तासात घरातून पळ काढला तर तिच्या सोबत असलेला असलम मिया आणि हर्षदा अलोने यांनी देखील काढता पाय घेतला. आपली झालेली फसवणूक राजेश यांना चांगलीच जिव्हारी लागली आणि त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपींच्या विरोधात तक्रार नोंदवली.