गच्चीवरची ‘ हवेशीर ‘ झोप पडली ह्या भावाला , आता प्रकरण पोलिसात

Spread the love

महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना सोलापूर जिल्ह्यात समोर आली असून उन्हाळा असल्याने घराच्या गच्चीवर झोपायला गेल्यावर चोरटयांनी घराचे कुलूप तोडून लोखंडी कपाटातील तब्बल सत्तावीस तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण तेरा लाख रुपयांचा ऐवज लंपास केलेला आहे. 23 एप्रिल रोजी माढा तालुक्यातील चींचगाव येथे ही घटना घडलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, प्रवीण भानुदास साठे ( राहणार चिंचगाव तालुका माढा ) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोराच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे . रात्री घराला कुलूप लावून प्रवीण साठे हे घरात गरम होत असल्याने घराच्या छतावर झोपायला गेले होते. त्यांना पहाटे सकाळी लवकर कामावर जायचे असल्याने ते तीन वाजण्याच्या सुमारास छतावरून उतरुन खाली आले आणि आईला जाऊन उठवले .

त्यानंतर घरात जाऊन पाहिले असता घरातील लोखंडी कपाटाचा दरवाजा उघडा होता आणि त्यातील सगळे सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. सोन्याच्या दागिन्यांचा डबा मोकळा होऊन बेडवर पडलेला होता. फिर्यादी यांची आजी वेणूबाई उबाळे या मयत झालेल्या असल्याने त्यांच्या पाटल्या, लॉकेट आणि चार अंगठ्या यादेखील चोरट्यांनी लंपास केलेल्या होत्या. सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हनुमंत वाघमारे हे करत आहेत.


Spread the love