महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून आपल्या अनैतिक संबंधाला विरोध करणाऱ्या पतीची पत्नीने अत्यंत अमानुषपणे हत्या केली आहे. धुळे जिल्ह्यातील ही घटना असून सोनगीर गावाजवळील एका विहिरीत बुधवारी एका चाळीस वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता.अज्ञात मारेकऱ्यांनी मृत व्यक्तीचे पाय चक्क अॅल्युमिनियमच्या तारेनं घट्ट बांधलेले होते तर त्याचे शरीरावर एक दगड दोरीने बांधला होता. मृतदेहाची ओळख पटताच दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी हत्येचा उलगडा केला असून या व्यक्तीची पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे .
उपलब्ध माहितीनुसार , निंबा रुपला पाटील असे या मयत व्यक्तीचे नाव असून निंबा पाटील यांच्या पत्नी अनिता हीचे गावातील शरद शाळिग्राम पाटील नावाच्या व्यक्तीसोबत अनैतिक प्रेमसंबंध सुरू होते.पतीला याची कल्पना येताच त्यांच्यात वाद होऊ लागले आणि पत्नीने प्रियकराला ‘ तू माझ्यासाठी काय करू शकतो ? ‘ असे विचारले आणि त्याच्याकडून ‘ काहीही ‘ असे उत्तर आल्याने तिने त्याला मदतीला घेत पतीला संपवण्याचा घाट रचला. पॉलिसी खाक्या दाखवताच दोघांनीही आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे
निंबा रुपला पाटील असं हत्या झालेल्या 40 वर्षीय व्यक्तीचं नाव असून ते सोनगीर येथील रहिवासी होते. परिसरात राहणाऱ्या येवले नामक व्यक्तीला आपल्या शेतातील विहिरीत एका 40 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला आणि त्यांनी पोलिसांना याच खबर दिली.पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह विहिरीतून बाहेर काढला.
संबंधित मृतदेह सोनगीर येथील निंबा रुपला पाटील यांचा असल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी पत्नीची चौकशी केली असताना त्यांना प्रकरणात काळेबेरे असल्याचा संशय आला आणि त्यांनी अनिताची कसून चौकशी केली असताना हे धक्कादायक कारण पुढे आले. पोलिसांनी आरोपी पत्नी अनितासह तिचा प्रियकर शरद पाटील याला अटक केली असून घटनेचा पुढील तपास शिंदखेडा पोलीस करत आहेत.