महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना धुळे जिल्ह्यात उघडकीला आली असून गिधाडे येथील तापी पुलावरून नदीपात्रात उडी घेऊन शिरपूर येथील एका पस्तीस वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केली आहे. बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास हा प्रकार घडलेला असून पुष्पराज अशोक पटेल असे या व्यक्तीचे नाव आहे. त्याने हा प्रकार का केला याचा तपास सुरू आहे.
उपलब्ध माहितीनुसार शिरपूर तालुक्यातील गिधाडे तापी नदी पुलावर बुधवारी सकाळी एक दुचाकी आढळून आली होती आणि तिथे एक पाकीट आणि मोबाईल देखील पडलेला होता. बराच काळ ही दुचाकी उभी असल्याने काही नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आला आणि त्यांनी नदीत डोकावून पाहिले असता पात्रात एकाचा मृतदेह तरंगताना आढळून आला त्यानंतर या प्रकाराची चर्चा सुरू झाली.
दुचाकीवरून तपास काढला असता ही दुचाकी शिरपूर येथील दूध डेअरी कॉलनीत राहणारा व्यक्ती पुष्पराज अशोक पटेल याची असल्याचे समोर आले. सदर प्रकरणी शिरपूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली असून पुष्पराज यांच्या पाठीमागे आई व वडील भाऊ भाऊ बहीण पत्नी दोन मुले असा परिवार आहे.