महाराष्ट्रात अनेक कंपन्यांमध्ये पुरुषांच्या बरोबरीने महिला काम करतात. महाराष्ट्रासारख्या प्रगतशील राज्यात महिलांनादेखील अनेक ठिकाणी काम देताना समानतेचा दर्जा दिला जातो मात्र प्रत्यक्षात काम करताना अनेक पुरुष सहकार्यांशी त्यांचा संपर्क येत असल्याने वाद देखील निर्माण होतात अशीच एक घटना नाशिक येथील सिडको परिसरात उघडकीला आली आहे.
कंपनीत काम करत झालेल्या वादाचा राग मनात ठेवून कंपनीतील चार ते पाच जणांच्या टोळक्याने पीडित महिलेला रात्री गाठून मारहाण करत तिचा विनयभंग केला. अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडलेली असून परिसरात याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास अंबड वजननाका वजन काटा परिसरात रात्री भावासोबत फिरत असताना चार ते पाच जणांनी येऊन पीडित महिलेला शिवीगाळ केली आणि मारहाण करून तिचा विनयभंग केला. सदर प्रकार हा आधी कंपनीत काम करणारा संशयित असलेला गोरख सूर्यवंशी आणि त्याचा मित्र रवींद्र सुतार तसेच इतर चार ते पाच जणांनी केला असल्याचे महिलेने म्हटले आहे.