महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना समोर आलेली असून भिवंडी येथे प्रियकराच्या छळाला कंटाळून विवाहित प्रेयसीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. भिवंडी तालुक्यातील कान्हेर येथील जय मातादी कंपाऊंड परिसरात ही घटना घडलेली असून नारपोली पोलीस ठाण्यात मयत महिलेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून तिच्या प्रियकरावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. विकास आडगळे असे आरोपीचे नाव आहे.
उपलब्ध माहितीनुसार, मयत महिलेचे वय 28 वर्षे असून ती मूळची पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात एका गावात कुटुंबासह राहत होती. तिचा विवाह झाला होता मात्र गेल्या दोन वर्षांपासून तिने पतीला सोडून दिले आणि त्यानंतर ती भिवंडी तालुक्यातील आपला प्रियकर असलेला विकास याच्या सोबत राहत होती. विकास याला दारूचे व्यसन होते त्यामुळे दोघांमध्ये सातत्याने भांडणे होत असायची. दररोज दारू पिऊन तो तिला मारहाण करत तिचा छळ करायचा आणि त्याच्या या छळाला कंटाळून तिने 18 ते 21 एप्रिल दरम्यान घरी कोणी नसताना किचनमध्ये गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले.
धक्कादायक बाब म्हणजे तिने आत्महत्या केल्याची बाब विकास याने तिच्या नातेवाईकांनी पोलिसांपासून लपवून ठेवली आणि 28 एप्रिल रोजी तिच्या आईने विकास यांच्या विरोधात नारपोली पोलिसात गुन्हा दाखल केला .