संजय राऊत यांनी सातत्याने भाजपवर केलेल्या टीकेला केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणेंनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले आहे .आजच्या या पत्रकार परिषदेत राणे यांनी जोरदार टोलेबाजी केली असून ‘ रात्री जे करायचं ते दिवसा करत असल्यानं संजय राऊतांना भान राहत नाही ‘, अशा शब्दात नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे .
काय म्हणाले नारायण राणे ?
माननीय संजय राऊतांचे अग्रलेख वाचले. अपक्ष उमेदवार हा दादरा नगरहवेलीत जिंकली. ती आम्ही जिंकली जिंकली असा डंका पिटला. संजय राऊत काहीतरी हवेतली विधाने करतात. हास्यास्पद दावे करतात, काहीही अग्रलेख लिहितात. मला वाटतं रात्री जे करायचं ते दिवसा करत असल्यानं राऊतांना भान राहत नाही. त्यांना लिखाण करताना भान नसतं
तुम्ही जे जिंकून आलात ते मोदींच्या भरोश्यावर. आधी युती केली आणि मग गद्दारी केली. मिडीयाने काही लोकांना सांभाळून घेतलं. मोदी सरकार बहुमतात आहे, तुम्ही तिथे धडक मारणार, पण धडक कशी असते ते तुम्हाला माहीत नाही वाटतं. दिल्लीला धडक मारायला आलात तर डोकं राहणार नाही जागेवर. डोक्याविना संजय राऊत दिसेल तिकडे. भाजपवर, मोदींवर टीकेचा भडिमार करतायत, संपलं आता यांचं म्हणे. आता तुम्ही जे 56 आमदार आहात, ते मोदींमुळेच निवडणून आलेले आहात. अन्यथा आठच्यावर जात नाहीत तुम्ही ‘ असे देखील नारायण राणे म्हणाले आहेत.