महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना जळगाव जिल्ह्यात समोर आली असून लग्नाचे आमिष दाखवून 20 वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्यात आले आणि लग्न न करता तिची फसवणूक करण्यात आली. त्यानंतर पीडित तरुणीने पोलीस ठाण्यात धाव घेत संशयित आरोपी विशाल राजेश तडवी ( वय 23 राहणार यावल ) याच्याविरोधात जळगाव शहरातील रामानंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, पीडित तरुणी ही शहरातील एका महाविद्यालयात बीएससी शिकत आहे याच दरम्यान तिची विशाल तडवी यांच्यासोबत ओळख झाली होती. त्याने तिला गोड गोड बोलून प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तिच्याकडे हळूहळू पैशाची मागणी सुरू केली. लग्न कधी करणार असे विचारणा केल्यानंतर तो टाळाटाळ करायचा मात्र काही दिवसांनी तो आपण लग्न करू असे म्हणत त्याने तिला संभाजीनगर येथील एका अपार्टमेंटमध्ये घेऊन गेला आणि तिथे तिच्यावर अत्याचार केला त्यानंतर देखील त्याने शहरातील विविध ठिकाणी वेगवेगळ्या लॉजवर नेऊन तिच्यासोबत वारंवार शरीरसंबंध ठेवले.
काही दिवसांनी आपण कोल्हापूर येथे जॉब करण्यासाठी जात आहोत असे त्याने तिला सांगितले आणि तो निघून गेला त्यानंतर पीडित तरुणीने त्याला अनेक वेळा मोबाईलवर संपर्क साधला मात्र त्याचा मोबाइल बंद येत होता. पीडित तरुणीने त्याच्या घरी जाऊन संपर्क साधला असता त्याचे दुसरीकडे लग्न ठरलेले आहे ही बाब समोर येताच पीडितेला धक्काच बसला. आपल्याला लग्नाचे आमिष दाखवून त्याने दुसरीकडेच लग्न ठरवले म्हणून पीडित तरुणीने रामानंद पोलिस ठाण्यात संशयिताच्या विरोधात तक्रार दाखल केलेली आहे.