‘ माझ बाळ कुठंय ? ‘ म्हणताच हातात दिली प्लॅस्टिकची बाहुली , धक्कादायक प्रकार

Spread the love

मुलं नसेल तर किती दुःख असते याची कल्पना न केलेलीच बरी मात्र दुर्दैवाने यासाठी काही लोक चक्क बाळाची देखील चोरी करतात, अशीच एक धक्कादायक घटना पाकिस्तानमध्ये उघडकीस आली आहे .बाळाला जन्म दिल्यानंतर भूल न उतरलेल्या आईच्या शेजारी पाळण्यात हे मूल ठेवण्यात आलं होतं मात्र बाळाची आई शुद्धीत आली आणि तिने आपल्या बाळाला पाहण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी तिला प्लॅस्टिकची बाहुली उचलून दिली. मुलं म्हणून आपल्या हातात बाहुली आल्याचे पाहून या महिलेला धक्काच बसला.

उपलब्ध माहितीनुसार, पाकिस्तानच्या रावळपिंडी इथे ही घटना उघडकीस आली आहे . रावळपिंडी इथे एक महिला डिलिव्हरीसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती. ज्या बाळाचा नऊ महिने पोटात सांभाळ केला होता त्याला पाहण्यासाठी आई आतुर झाली होती मात्र डिलिव्हरी नॉर्मल न होता सीझर करावे लागले आणि तिला त्यावेळी भूल देण्यात आली होती. भुलीचा अंमल असल्याने असल्यामुळे बाळाची आई ग्लानीत होती मात्र जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा तिने सर्वप्रथम आपल्या बाळाला जवळ देण्याची मागणी केली.

सदर महिलेनं जेव्हा आपलं बाळ मागितलं, तेव्हा पाळण्यात प्लॅस्टिकची बाहुली असल्याचं कर्मचाऱ्यांनी पाहिलं आणि त्यांनी तत्काळ हॉस्पिटल प्रशासनाला याची सूचना दिली त्यानंतर हॉस्पिटलनं पोलिसांना संपर्क साधत घटनेची कल्पना दिली असून पोलिसांनी हॉस्पिटल आणि परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली आहे. लवकरच आरोपीचा शोध घेतला जाईल आणि आईला बाळ परत मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असं आश्वासन पोलिसांनी या आईला दिलं आहे.


Spread the love