महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना यवतमाळ जिल्ह्यात उघडकीला आली असून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिला मुंबईला पळून गेले आणि तिचे लैंगिक शोषण केले मात्र प्रकरण पोलिसात पोहोचल्यानंतर पोलिसांनी मुंबईत दाखल होत आरोपीला बेड्या ठोकल्या.
उपलब्ध माहितीनुसार, ऋतिक हनुमान पेंदोर ( वय 22 ) असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याच्या तावडीतून पीडित मुलीची सुटका केली आहे. आरोपी ऋतिक याने सतरा वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते आणि तिला लग्नाचे आमिष दाखवत तिचे लैंगिक शोषण केले. काही कालावधीनंतर त्याने तिला लावून पळवून देखील नेले.
मुलगी घरातून बेपत्ता झाल्यावर आई-वडील हादरून गेले आणि त्यांनी तातडीने वनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. गेल्या वीस दिवसांपासून ऋत्विक हा मुलीला घेऊन फरार झालेला होता तर त्यांचे मोबाईल देखील बंद येत असल्याने लोकेशन देखील पोलिसांना आढळून येत नव्हते त्यानंतर चार मे रोजी पीडित मुलीने एका अनोळखी मोबाईलवरून तिच्या मैत्रिणीला फोन लावला त्यावेळी मी पुण्यात असून मुंबईला चाललेले आहे असे सांगितले.
आपल्या मैत्रिणीचा असा फोन आल्यानंतर तिच्या दुसऱ्या मैत्रिणीने ही माहिती पोलिसांना दिली आणि पोलिसांनी आलेला कॉल तपासला असता तो नंबर ट्रॅव्हलच्या बस चालकाचा निघाला. त्यानंतर तातडीने पोलिसांनी ट्रॅव्हल चालकाला फोन केल्यानंतर मुलगा आणि मुलगी ट्रॅव्हलच्या बसमध्ये असल्याचे लक्षात आले आणि 112 क्रमांकावर सदर प्रकाराची माहिती देण्यात आल्यानंतर एपीआय आनंद पिंगळे यांनी पथकासह हायवेवर जाऊन बस थांबवली आणि तरुण आणि मुलीला ताब्यात घेतले त्यानंतर वनी पोलिसांचे एक पथक मुलीच्या आईला घेऊन मुंबईत दाखल झाले आणि दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. आरोपी ऋतिक याला नऊ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.