पुण्यात खळबळ..पोटच्या मुलाला दोन वर्षे तब्बल ‘ इतक्या ‘ कुत्र्यांच्या सोबत डांबले

Spread the love

पुणे शहरात एक खळबळजनक घटना समोर आलेली असून पुढच्या अकरा वर्षाच्या मुलाला तब्बल दोन वर्ष कुत्र्यांच्या सोबत कोंडून ठेवण्याचा धक्कादायक प्रकार कोंढवा येथे उघडकीला आला आहे. पोलिसांनी संबंधित दाम्पत्यावर आता गुन्हा नोंदवला असून कुत्र्यांसोबत सतत राहिल्याने मुलांच्या वर्तनात देखील बदल झालेला असून त्यांच्यासारखेच तो देखील वेगळेच वागत असल्याचे बालकल्याण समितीच्या लक्षात आलेले आहे. पालकांना लवकरच अटक करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, सदर सोसायटीतील काही जागरूक नागरिकांनी मुलाच्या या प्रकाराबद्दल ज्ञानदेवी चाइल्ड लाइनच्या अनुराधा सहस्रबुद्धे यांना कल्पना दिली. त्यांच्या पथकाने ज्यावेळी घराला भेट दिली त्यावेळी त्यांनी मुलांच्या पालकांची कानउघाडणी केली मात्र दुसर्‍या दिवशी पथक पुन्हा आले त्यावेळी देखील घराला कुलूप लावलेले होते आणि आतमध्ये मुलगा कुत्र्यांसोबत बसलेला होता. तिथे प्रचंड अशी अस्वच्छता देखील होती.

अनुराधा सहस्रबुद्धे यांनी या प्रकाराबद्दल बोलताना म्हटले आहे की, ‘ सदर कुटुंबच सुमारे बावीस कुत्र्यांच्या सोबत राहत होते मात्र बाहेर जाताना ते मुलाला घरात कोंडून बाहेरून कुलूप लावून जात होते. मुलाला सोडवले त्या वेळी पालकांनी कोणताही विरोध केला नाही. कुत्र्यांच्या प्रेमापुढे आमचे लग्न झाले म्हणून आम्ही कुत्र्यांसोबत राहतो आणि बाहेर कोरोना असल्याने मुलाला घरात ठेवत होतो ‘, असे सांगितले आहे.

मुलाची सुटका केल्यानंतर तो कुत्र्यासारखाच वागत असल्याचे दिसून आले असून तो अशक्त झालेला आहे. त्याच्या मानसिक आरोग्यावर देखील परिणाम झाला असून त्याला समुपदेशनाची गरज आहे. त्याचे पालक त्याचा सांभाळ करू शकत नसल्याने त्याला बालकल्याण समितीकडे देण्यात आलेले आहे.. सोसायटीतील त्याच्या मित्रांनी अनेकदा तो अंगावर यायचा आणि कुत्र्याप्रमाणे चावा घेण्याचा प्रयत्न करायचा असे देखील म्हटले आहे. सदर प्रकरणी पालकांना लवकरच अटक करण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.


Spread the love