महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर इथे घडलेली असून शिरूर तालुक्यातील एका टुरिस्ट व्यावसायिकाची आपण फ्लिपकार्ट कंपनीचा अधिकारी आहोत असे सांगत वेगवेगळे साहित्य देण्याचे आमिष दाखवून पाच लाख बावन्न हजारांना त्यांना फसवण्यात आलेले आहे. सदर प्रकरणी शिक्रापूर येथे अंबादास नारायण गायकवाड या इसमावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई येथील प्रदीप उकिरडे यांचा टूर्स आणि ट्रॅव्हल्स व्यवसाय आहे. या व्यवसायातून त्यांची अंबादास गायकवाड याच्यासोबत ओळख झाली होती त्यावेळी त्याने आपण फ्लिपकार्ट कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे सांगत विश्वास संपादन केला आणि स्वस्तात मोबाईल लॅपटॉप आधी साहित्य घेऊन उकिरडे यांच्याकडून काही रोख स्वरूपात तर काही ऑनलाईन पद्धतीने पाच लाख 52 हजार रुपये घेतले आणि तो गायब झाला.
उकिरडे यांनी त्यांच्याशी वारंवार संपर्क केला मात्र संपर्क होऊ शकला नाही त्यानंतर फिर्यादी यांना आपली फसवणूक झाल्याची जाणीव झाली आणि त्यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. शिक्रापूर पोलिसांनी अंबादास नारायण गायकवाड ( राहणार मढेवडगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा नगर ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे.