‘ तुझा बाप श्रीमंत आहे ‘ , गर्भवती महिलेच्या ‘ त्या ‘ आत्महत्येप्रकरणी मोठे अपडेट

Spread the love

महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना पुणे येथे उघडकीला आली होती. लग्नात मानपान केले नाही आणि हुंडा दिला नाही म्हणून गर्भवती असलेल्या सुनेकडे पैशाचा तगादा लावण्यात आला आणि सोन्याच्या दागिन्यांची मागणी करत तिला त्रास देण्यात आला त्यानंतर या सुनेने आत्महत्या केली होती. सदर प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्यावरून सासू आणि दिराचा अटकपूर्व जामीन हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, सपना मदन कानडे ( वय 57 ) अरुण मदन कानडे ( वय 26 ) अशी अटकपूर्व जामीन फेटाळला गेलेल्या व्यक्तींची नावे आहेत. दिव्या तरुण कानडे (वय २४) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तिच्या वडिलांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती त्यानंतर पती तरुण कानडे आणि सासरा मदन धोंडीबा कानडे यांच्यासह सासू आणि दिराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत करत पती आणि सासर्‍याला अटक केली असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. 25 एप्रिल रोजी हांडेवाडी रोडवर ही घटना एका सोसायटीत घडली होती.

आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेकडे पती, सासू सासरे आणि दीर सतत पैसे आणि सोन्याचे दागिने यांची मागणी करत होते. तुझे वडील श्रीमंत असून त्यांना कुठे मुलगा आहे म्हणून लग्नात मानपान केला नाही असे करून ते तिला त्रास देत होते अखेर त्याला कंटाळून इमारतीवरून उडी घेऊन तिने आत्महत्या केली होती.

सदर प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पती आणि सासर्‍याला अटक करण्यात आली तर सासू आणि दिराने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता मात्र तो फेटाळण्यात आला. आत्महत्या करण्यापूर्वी मुलीने केलेल्या व्हाट्सअप मेसेजमध्ये खूप त्रास होत होता असे निष्पन्न झाल्याने तिचा छळ झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. मृत्यूसमयी ती गर्भवती होती ही देखील बाब तपासादरम्यान पुढे आली. गुन्हा दाखल झाल्यानंतर सासू आणि दीर फरार आहेत. त्यांना जामीन मंजूर झाला तर कायद्याचा धाक राहणार नाही. ते फिर्यादी साक्षीदार यांना धमकावण्याची शक्यता आहे, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला होता न्यायालयाने तो मान्य केला आणि त्यांचा जामीन फेटाळला .


Spread the love