देशात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असून अशीच एक घटना उत्तर प्रदेशात पिलभीत इथे उघडकीस आली आहे .एका सुनेने आपल्या सासऱ्यावरतीच बलात्कार आणि विनयभंगाचा आरोप लावला आहे. पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, तिचा नवरा घराबाहेर पडला की तिचा सासरा तिच्यासोबत अश्लील कृत्य करत होता.
महिलेने म्हटलं आहे की, मुलगा गेल्यावर सून घरात एकटी असल्याचा फायदा सासरा घेत होता. मुलाच्या लग्नानंतर सासऱ्याची सुनेवर घाणेरडी नजर ठेवत होती. एके दिवशी तिचा नवरा निघून गेल्यावर सासऱ्याने तिला खोलीत बोलावून तिच्यावर तोंडात बोळा कोंबून बलात्कार केला आणि सदर प्रकाराची कुठे वाच्यता करू नकोस म्हणून धमकावले.
त्याच्या या धमकीमुळे महिला शांत राहिली आणि त्याचा गैरफायदा घेत या आरोपीने तिच्यावर अनेकवेळा बलात्कार केला. महिलेने आपल्या पतीला हा झालेला प्रकार कानी घातला तर उलट तिला मारण्याची धमकी देण्यात आली. महिलेने पोलिसात यासंदर्भात तक्रार करण्याचा निर्णय घेतला परंतु तेथे देखील कोणी तिची तक्रार नोंदवून घेतली नाही म्हणून पीडितेने एसपीकडे तक्रार दाखल केली आहे.