बीड जिल्ह्यात अवैध गर्भपात प्रकरणातील मुख्य एजंट असलेली मनीषा सानप हिला दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली असून पोलीस कोठडी मिळाल्यानंतर देखील तिच्या चेहर्यावर कुठलेच दुःख दिसत नव्हते. ती अत्यंत हास्य मुद्रेने ही गाडीत बसून गेली तर मयत शितल गाडे प्रकरणात तिचा पती, सासरा, भाऊ आणि लेबल तपासण्या करणाऱ्या करणारा तपासणीस यांचा मुक्काम देखील दोन दिवस पोलिस कोठडीत वाढलेला आहे. औरंगाबाद येथे सदर गुन्ह्यात वापरलेले सोनोग्राफी मशीन देखील जप्त करण्यात आले आहे.
काय आहे प्रकरण ?
बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा अवैध गर्भपात प्रकरण चर्चेत आलेले असून या प्रकरणात एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर सदर प्रकाराला वाचा फुटली होती. गर्भलिंगनिदान करणार्या फरार झालेल्या डॉक्टरचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले असून हा डॉक्टर शिकाऊ असल्याची प्राथमिक माहिती आहे. तो औरंगाबाद जिल्ह्यातला असून त्याला नगर शहरातून बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत.
उपलब्ध माहितीनुसार, सतीश बाळू सोनवणे ( राहणार जाधव वाडी तालुका जिल्हा औरंगाबाद ) असे या डॉक्टरचे नाव असून शितल गाडे ( वय 30 राहणार बकरवाडी तालुका बीड ) या महिलेचा अवैध गर्भपात केल्याने मृत्यू झाला होता. या प्रकरणात तिचा पती गणेश गाडे , सासरा सुंदर गाडे ,भाऊ नारायण निंबाळकर अंगणवाडी सेविका मनीषा सानप, प्रयोगशाळा तंत्रज्ञ वासुदेव गायके, सीमा डोंगरे यांच्याविरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे.
गुन्हा दाखल झाल्याचे समजतात सदर प्रकरणातील सीमा डोंगरे तिचा मृतदेह एका तलावात आढळून आला होता तर उर्वरित पाच आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून मनीषा पोलीस कोठडीत आहेत तर इतर व्यक्तींना 14 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती आणि ती पुन्हा वाढवण्यात आली आहे. तपासाच्या दरम्यान मनीषा ही एजंट म्हणून काम करत असल्याचे समोर आले असून एक गर्भलिंगनिदान करण्यासाठी मनीषा ही पंचवीस हजार रुपये घेत होती तर त्यातील दहा हजार रुपये सतीशला मिळत होते असेही समोर आले आहे. मनीषा हिच्या घरात मोठ्या प्रमाणावर रक्कम देखील आढळून आल्याने या प्रकरणाची व्याप्ती वाढतच असल्याचे दिसून येत आहे.