पुण्यात खळबळ..युनिसेक्सच्या नावाखाली आतमध्ये ‘ नको ते ‘, तब्बल इतक्या तरुणी सापडल्या

Spread the love

पुणे शहरात एक खळबळजनक घटना विमाननगर परिसरात उघडकीला आली असून मसाज सेंटरमध्ये एक्स्ट्रा सर्व्हिसच्या नावाखाली चक्क वेश्या व्यवसाय सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे .सामाजिक सुरक्षा विभागाने हा प्रकार उघडकीला आणला असून मसाज सेंटरच्या मालकासह नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. घटनास्थळावरून तब्बल आठ तरुणींची सुटका करण्यात आलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार व्यवस्थापक हिना अकबरअली सय्यद ( वय 30 राहणार लोहगाव ), सहाय्यक व्यवस्थापक ताजुलइस्लाम अब्दुल वाहिद ( वय 30 राहणार विमान नगर ) , फारूक अहमद ( वय 32 राहणार विमाननगर ) यांना बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत तर मसाज सेंटरचा मालक सुरेश बाबुलाल परदेशी ( राहणार कसबा पेठ ) संदीप हरिश्‍चंद्र सहस्त्रबुद्धे ( राहणार श्रीकृष्ण कॉलनी काळेवाडी ) , अविनाश खिंवसरा ( राहणार कसबा पेठ ) आणि सदर जाण्यासाठी सदर व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून देणारे मालक अविनाश भाऊसाहेब साकोरे, भाऊसाहेब साकोरे यांच्यासह आणखी एक जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

विमाननगर येथील एका आलिशान इमारतीत ऍटोमोस्पीअर यूनीसेक्स हेअर अँड ब्युटी स्टुडिओ या नावाने मसाज सेंटरचा हा व्यवसाय सुरू होता मात्र तिथे एक्स्ट्रा सर्व्हिसच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याचा असल्याची माहिती गुप्त सूत्रांच्या माध्यमातून सामाजिक सुरक्षा पथकाला मिळाली. त्यानंतर त्यांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री करून घेतली आणि ग्राहकाने इशारा करता पथकाने कारवाई करत तब्बल आठ तरुणींना तिथून मुक्त केले आहे. अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुरानीक, उपनिरीक्षक सुप्रिया पंढरकर, राजश्री मोहिते, इरफान पठाण आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे.


Spread the love