सपना चौधरीवरून धनंजय मुंढे यांच्यावर सुरु झालीय टीका, काय आहे कारण ?

Spread the love

सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघात दिवाळीत आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात प्रसिद्ध हरियाणवी डान्सर आणि ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री सपना चौधरी हिने ठुमके लगावले. या डान्सचे व्हिडीओ समोर आल्यानंतर शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधत ‘ सामाजिक मंत्र्यांचं भान हरवलं आहे ‘ अशी टीका केली आहे . दिवाळीनिमित्त आयोजित केलेल्या स्नेहमीलन कार्यक्रमानंतर धनंजय मुंडेंवर टीका केली जात आहेत .

एकीकडे राज्यात एसटी कर्मचारी, शेतकरी आत्महत्या यासारखे प्रश्न प्रलंबित असताना महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांना हे शोभत का ? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

काय म्हणाले विनायक मेटे ?

परळीमध्ये सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी सपना चौधरीचा डान्सचा कार्यक्रम ठेवला. कालच अहमदनगरमध्ये सरकारी रुग्णालयात अकरा जणांचा दुर्दैवाने आक्रोश करत होरपळून मृत्यू झाला. सदर धक्कादायक घटनेचे सावट असताना शेतकऱ्यांना आजही पैसे मिळाले नाहीत. त्यांची उपाशीपोटी काळी दिवाळी साजरी होत असताना हे इथे सपना चौधरीला ठुमके लगावताना पाहतात.एसटी कामगार घर-दार सोडून आपल्या हक्कासाठी आंदोलन करत आहेत, आक्रोश करत आहेत. त्यामध्ये लक्ष घालायचं सोडून हे सपना चौधरीला आणून ठुमके लावायला सांगतात. सामाजिक खात्याचं सामाजिक भान सामाजिक मंत्र्यांनी राखायला हवं.

बीड जिल्ह्यात खूप मोठे प्रश्न उभे राहिले आहेत. त्याचा कधीतरी आढावा पालकमंत्र्यांनी घ्यावा. कायदा सुव्यवस्था, महिला अत्याचार, अवैध धंदे, जमिनी हडपण्याचे प्रकार यामध्ये लक्ष घातलं तर बरं होईल. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आजही अतिवृष्टीची मदत मिळाली नाही. धनंजय मुंडे विरोधी पक्षनेते असताना त्यांना सामाजिक भान होतं मात्र आता त्यांचे सामाजिक भान हरवले आहे.


Spread the love