काही दिवसांपूर्वी मुंबईतील कांदिवली येथील दळवी हॉस्पिटलच्या इमारतीत चार जणांचे मृतदेह आढळून आले होते. सदर प्रकरणी एक मोठा खुलासा झालेला असून मयत असलेला शिवदयाल सेन ( वय 60 ) याने अल्पवयीन असलेली मुलगी भूमी दळवी ( वय 17 ) हिच्यासोबत विवाह केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. शिवदयाल सेन हा मूळचा पश्चिम बंगालचा असून कुमारीका मुलीचा जर मृत्यू झाला तर तिचा आत्मा भटकत राहतो म्हणून केवळ त्याने या मुलीशी विवाह केल्याचा प्रकार समोर आला आहे. नरबळीचा प्रकार हा नसून कौटुंबिक कलहातून ही घटना घडल्याचे समोर आलेले आहे.
शिवदयाल सेन याने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये भूमी दळवी हिचा ‘ आय लव यु बेबी ‘ असा उल्लेख असून शिवदयाल हा भूमी दळवी हिच्यावर नातीप्रमाणे प्रेम करत होता अन त्याच्या मनात तिच्याबद्दल कुठलेही शारीरिक आकर्षण नव्हते अशीही बाब समोर आलेली आहे. भूमी हिची आई किरण हिच्या विवाहबाह्य संबंधाला तिची मुलगी भूमी आणि आणि त्यांचा केअरटेकर असलेला शिवदयाल सेन हे वैतागले होते त्यातून त्यांनी किरण आणि भूमी हिची मोठी बहीण यांचा खून केला आणि त्यानंतर लग्न करून शिवदयाल आणि भूमी यांनी गळफास घेतला असे समोर आलेले आहे.
विवाह करण्यापूर्वी त्यांनी गणपतीचा फोटो समोर ठेवला आणि शिवदयाल याने भूमीसोबत लग्न केले त्यामध्ये त्याचा शारीरिक सुखाचा उद्देश नव्हता मात्र केवळ आत्म्याला मुक्ती मिळाली नाही तर तो भटकत राहतो असा समज असल्याने मी हा विधी करत असून दोघेही एकत्र जग सोडून जात आहे असे म्हटले आहे तसेच भूमि हीने ‘ मी गेल्यावर माझ्या वडिलांना त्रास देऊ नका ‘ , असेही म्हटलेले आहे सदर प्रकारानंतर भूमी हिचे वडील असलेले आशिष यांना मोठा धक्का बसलेला आहे.