महाराष्ट्रात अनेक खळबळजनक घटना उघडकीला येत असताना अशीच एक घटना नांदेड येथे उघडकीला आलेली असून नांदेड येथील सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षक मल्लिकार्जुन स्वामी ( वय 82 ) यांनी राहत्या घरात बंदुकीमधून गोळी झाडून आत्महत्या केलेली आहे. रविवारी रात्री हा प्रकार घडलेला असून प्राथमिक माहितीनुसार त्यांना श्वसनाचा त्रास होत होता त्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.
मल्लिकार्जुन स्वामी हे सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षक होते मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांना श्वसनाचा त्रास सुरू झाला होता. पुणे येथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया देखील केली होती आणि त्यानंतर ते शारदानगर येथे त्यांच्या राहत्या घरी राहत होते मात्र शस्त्रक्रिया झाल्यानंतर देखील त्यांना श्वसनाचा त्रास सुरू होता त्यातून ते नैराश्यात गेले होते आणि त्यांनी बाथरूममध्ये स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.
मल्लिकार्जुन स्वामी यांनी मृत्यूपूर्व सुसाईड नोट लिहून ठेवलेले असून त्यामध्ये श्वसनाचा त्रास होत असल्याने आपण आत्महत्या करत आहोत त्यामुळे इतर कुणालाही आपल्या आत्महत्येसाठी जबाबदार धरू नये असे म्हटलेले आहे. भाग्यनगरचे पोलीस निरीक्षक सुधाकर आडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केलेला असून त्यांच्या मूळ गावी स्वामी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत.