रेल्वेतून जवान साताऱ्यात तिला भेटायला आला मात्र पुढील प्लॅन तयारच होता

Spread the love

महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात एक खळबळजनक घटना समोर आली असून हवाई दलात काम करणाऱ्या एका जवानाला एका तरुणीने इंस्टाग्रामवर ओळख करत आपल्या जाळ्यात अडकवले आणि या तरुणीने जवानाकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत घेतली अन त्यानंतर सातारा इथे बोलावून दमदाटी करून त्याची फसवणूक केली असा प्रकार समोर आला आहे .

उपलब्ध माहितीनुसार, सदर तरुणी ही सातारा येथील रहिवासी असून पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यात राहणाऱ्या एका 21 वर्षीय जवानाची या तरुणीसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली होती. सदर तरुणीने इंस्टाग्रामवर आणि फेसबुकवर या व्यक्तीशी सुरुवातीला बोलणे चालू केले आणि त्यानंतर मोबाईल नंबर शेअर केल्यावर दोघे एकमेकांशी बोलत होते. अवघ्या काही दिवसात तिने जवानाला मला भेटायला साताऱ्याला ये असे सांगत साताऱ्याला बोलवले.

साताऱ्याला आल्यानंतर तीन जुलै रोजी जवान रेल्वेतून खाली उतरला त्या वेळी तिने त्याला एका गाडीत बसवले आणि गाडीतून जात असताना आणखीन तीन तरुण तिथे आले आणि त्यांनी तरुणीसोबत काय करत आहेस असे सांगत ‘ तू तरुणीचा विनयभंग केला आहेस तुझ्या विरोधात पोलिसात तक्रार देतो ‘ असे सांगत धमकावत पैसे उकळले. सदर प्रकार घडल्यानंतर जवानाने पोलीस ठाण्यात धाव घेत सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन संबंधित तरुणी आणि तिच्यासोबत असलेल्या चार व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत .


Spread the love