पुणे ब्रेकिंग..कुख्यात गुंड शरद मोहोळ होणार तडीपार , वाचा पूर्ण बातमी

Spread the love

पुणे शहरातील कुख्यात गुंड असलेला शरद मोहोळ याला सहा महिन्यांसाठी पुणे शहर पिंपरी-चिंचवड तसेच पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेले आहे. आगामी निवडणुकीत त्याच्याकडून गंभीर गुन्हा घडण्याची शक्यता असल्याने पोलीस उपायुक्त पूर्णिमा गायकवाड यांनी हे आदेश दिले आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, शरद हिरामण मोहोळ ( वय 38 राहणार माऊली नगर कोथरूड ) याच्या विरोधात अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. पिंटू मारणे खून प्रकरणात सत्र न्यायालयाने शरद मोहोळ यास जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे मात्र गेल्यावर्षी जामीन मंजूर झाल्यानंतर कारागृहाबाहेर आल्यावर शरद मोहोळ आणि त्याच्या साथीदारांनी दहशत माजवण्याचा प्रकार सुरू केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

त्याला तडीपार करण्याचा प्रस्ताव कोथरूड ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप, पोलीस निरीक्षक बाळासाहेब उघडेल यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करून पाठविण्यात आला होता त्याला मंजुरी देण्यात आलेली आहे. शरद मोहोळ टोळीने एका सरपंचाचे अपहरण करून खंडणी उकळण्याच्या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती. येरवडा कारागृहातील अंडा सेलमध्ये त्याची रवानगी करण्यात आली होती त्यावेळी त्याने दहशतवादी कातील सिद्दिकी याचा नाडीने गळा आवळून खून केला होता.


Spread the love