पुण्यात एक खळबळजनक घटना समोर आलेली असून महापालिकेच्या घंटागाडीवर काम करणार्या महिलेचा चालकाने विनयभंग केल्याचा प्रकार घडलेला आहे सदर प्रकरणी घंटागाडी चालवणाऱ्या या व्यक्तीला पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या असून सदर घटना नोव्हेंबर 2021 ते जुलै 2022 पर्यंत पाटीलनगर परिसरात घडली असल्याचे फिर्यादी यांचे म्हणणे आहे.
उपलब्ध माहितीनुसार, लक्ष्मण खंडू साळवे ( वय 28 राहणार विठ्ठल नगर पिंपरी ) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून आरोपी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कचरा गोळा करणाऱ्या घंटागाडीचा चालक होता तर पीडित महिला ही घंटागाडीवर मार्गदर्शनाचे काम करत होती आरोपीने फिर्यादी यांच्यासोबत गैरवर्तन केले मात्र त्यानंतर फिर्यादी महिलेने बदली करून घेतली तरीदेखील आरोपी हा वेळोवेळी त्यांना मेसेज करून त्रास देत होता असे फिर्यादी यांचे म्हणणे आहे.
फिर्यादी आपल्याला टाळत आहे हे लक्षात आल्यानंतर त्याने फिर्यादी यांच्या मैत्रिणीला मोबाईलवर फोन करून त्यांचा पाठलाग केला. सदर प्रकरणी चिखली पोलिस तपास करत असून गेल्या काही महिन्यात विनयभंगाच्या घटनांमध्ये तसेच अत्याचाराच्या घटनेत पुणे जिल्ह्यात वाढ होताना दिसून येत आहे.