‘ राज्यात सध्या मोठे राजकीय घमासान सुरू असून बंडखोर आमदार रोज आपल्या बंडखोरीबद्दल नवनवीन कारणे देत आहेत आता या आमदारांनी नक्की बाहेर पडण्याचे कारण काय हे एकदाच ठरवावे. आमदार का सोडून गेले हे सर्वांना माहिती आहे उगाच ओरडून फायदा नाही ‘ अशा शब्दात शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी बंडखोर नेत्यांना खडे बोल सुनावले आहेत.
बंडखोर नेते संजय राऊत यांच्यामुळेच आम्ही बंड केले आहे असे ते म्हणत आहेत त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना , ‘ शिंदे गट हा प्रचंड गोंधळलेला आहे. त्यामुळे बंड करण्याची रोज नवीन कारणे ते देत आहेत. बंडखोरांनी काय बोलायचे हे ठरवण्यासाठी या सर्व आमदारासाठी एक प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करावी आणि त्यात बंडाचे नेमके कारण काय आहे हे ठरवावे. काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी ‘ खोके मध्ये ओके ‘ असे म्हटल्याचे देखील संजय राऊत पुढे म्हणाले.
शिवसेनेच्या सुमारे 40 आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील असलेले महाविकास आघाडीचे सरकार कोसळले होते त्यानंतर भाजपने एकनाथ शिंदे गटाशी जुळवून घेत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसवले. सुरुवातीला आमदारांनी हिंदुत्वाच्या विचारांमुळे आम्ही बंड केले असे म्हटले होते मात्र त्यानंतर निधीचे कारण त्यांच्याकडून देण्यात आले त्यानंतर काही दिवसांनी उद्धव ठाकरे यांना बडव्यांनी घेरलेले आहे असेही कारण देण्यात आले त्यावरून संजय राऊत यांनी आमदारांवर निशाणा साधला आहे.