राज्यात झालेल्या राजकीय घमासानानंतर मातोश्री निवासस्थानी अनेक शिवसैनिक धाव घेत आहेत . एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यात सत्तांतर झाले असले तरी हाडाचे शिवसैनिक हे अद्यापही उद्धव ठाकरे यांच्या सोबतच असल्याचे पाहायला मिळत आहे त्यातून अनेक शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी जात असून बुधवारी कसारा येथून उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेलेल्या भगवान काळे या शिवसैनिकांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेला आहे.
बुधवारी शहापूर, आसनगाव, कसारा, खर्डी या भागातील शिवसैनिक उद्धव ठाकरे यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी मातोश्रीवर पोहोचले होते त्यावेळी उद्धव ठाकरे आणि शिवसैनिक यांच्यात बैठक सुरू असताना कसारा येथील रहिवासी असलेले भगवान काळे यांच्या छातीत त्रास होऊ लागला त्यानंतर त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांचा मृत्यू झालेला होता.