नगर जिल्ह्यात बहुचर्चित असलेल्या कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी तिचा पती शंकर किशोर साळवे ( वय वीस ) याला जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एम एस शेख यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे सोबतच त्याला पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास आणखी सहा महिन्यांची साधी कैद असे या शिक्षेचे स्वरूप आहे.
उपलब्ध माहितीनुसार, शंकर किशोर साळवे याचे नेहा नावाच्या एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते त्यानंतर सदर प्रकरणी मुलीच्या घरी माहिती झाल्यानंतर त्यांनी मुलगी अल्पवयीन असल्याने ती सज्ञान होईपर्यंत लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. 2020 साली नेहा हिचे अठरा वर्षे पूर्ण झाले आणि त्यानंतर कुटुंबियांच्या संमतीने शंकर याच्यासोबत तिचा विवाह झाला. विवाहानंतर काही दिवसात सासरच्या मंडळी सोबत वाद झाल्याने तिने तिच्या भावाला या प्रकाराची कल्पना दिली आणि भावाने सासरी मिरजगाव येथे येऊन समजूत काढली होती. त्यावेळी दोन्ही परिवारात मोठी खडाजंगी झाली होती आणि शंकर याने तिचे डोके भिंतीवर आपटले होते.
माहेरची मंडळी त्यानंतर घरी जात असतानाच नेहा हिचा पती शंकर याने नेहाच्या भावाला फोन करून तिने आत्महत्या केली आहे असा निरोप दिला होता त्यानंतर माहेरच्या मंडळीच्या तक्रारीवरून शंकर याच्याविरोधात पत्नीला जीवे मारण्याची फिर्याद देण्यात आली होती आणि त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली होती. सदर प्रकरणी न्यायालयाने निर्णय सुनावलेला असून सरकारी पक्षाच्या वतीने संगीता ढगे यांनी कामकाज पाहिले आणि त्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे.