महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असून अशीच एक घटना मुंबई इथे सन २०१४ साली गोरेगाव इथे घडली होती. एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीला भररस्त्यात अडवत चुंबन घेणाऱ्या एका २५ वर्षांच्या तरुणाला सत्र न्यायालयाने चार वर्षांचा कारावास आणि दंड ठोठावला आहे. भर रस्त्यात हा धक्कादायक प्रकार घडल्याने त्यावेळी गोरेगाव इथे चांगलीच खळबळ उडाली होती.
उपलब्ध माहितीनुसार , आरोपीचे महाविद्यालयात शिकणाऱ्या १७ वर्षांच्या मुलीवर एकतर्फी प्रेम होते. संध्याकाळी ७ च्या सुमारास ती बसस्थानकावर उभी असताना आरोपी तिथे आला अन तिच्या ओठांवर चुंबन घेतले. आपल्यासोबत झालेल्या या धक्कादायक प्रकाराने मुलगी घाबरून गेली आणि तिने तेथून पळ काढला त्यानंतर तिने पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आणि त्याच्यावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.