अन ‘ ती ‘ बँक चक्क अस्तित्वातच नाही , महिला म्हणतात की तो आला अन ..

Spread the love

महाराष्ट्र अनेक फसवणुकीचे प्रकार उघडकीला येत असताना असाच एक प्रकार पाथर्डी तालुक्यात समोर आलेला असून एका व्यक्तीने तुम्हाला इंडोनेशियन बँकेचे कर्ज मिळवून देतो असे सांगत पाथर्डी शहरातील सुमारे 50 महिला तसेच तालुक्यातील इतर ठिकाणी देखील बचत गटाच्या अनेक महिलांना लाखो रुपयांना गंडा घातलेला आहे. सदर प्रकरणी आकाश काळोखे ( राहणार पाथर्डी ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, सदर व्यक्तीचे नाव हे रणजीत असल्याचे समजते मात्र त्याविषयी अधिक माहिती अद्यापही नागरिकांना नाही. फसवणूक झालेल्या पाथर्डी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी त्याने महिलांना आपल्या जाळ्यात ओढत तुम्हाला इंडोनेशियन बँकेचे कर्ज करून देतो. त्याचा व्याजदर अत्यंत कमी राहील असे सांगत आपल्या त्यांच्याकडून प्रत्येकी एक हजार 950 रुपये घेतले होते. काही कालावधीत त्याने परिसरातील इतर महिलांना देखील अशाच पद्धतीने फसवत प्रत्येकाकडून सुमारे एक हजार 950 रुपये जमा केले.

तक्रारदार यांना आणि त्यांची आई आणि आत्या यांना देखील या व्यक्तीने चुना लावलेला असून त्याने त्यांना आपण इंडोनेशियन बँकेचे फायनान्स कंपनीत काम करत आहे असे सांगत आपले नाव रणजीत आहे इतकीच त्रोटक माहिती दिली होती. त्यानंतर अनेक महिलांना त्याने कर्जाचे आमिष दाखवत आपल्या जाळ्यात ओढले आणि त्यानंतर मोठी रक्कम जमा झाल्यानंतर त्याचा फोन स्विच ऑफ झाला.

रणजीत त्याचा फोन स्विच ऑफ झाल्यानंतर महिलांनी शेवगाव येथील इतर बँकांकडे चौकशी केली असता अशी कुठलीही बँक नसल्याचे त्यांच्या लक्षात आले . दरम्यानच्या काळात काही चाणाक्ष महिलांनी त्याचा फोटो काढला होता तो आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून परिसरातील अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि महिलांनी पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांना या प्रकरणी लेखी निवेदन दिले आहे त्यामध्ये या प्रकरणाची चौकशी करून आमचे पैसे आम्हाला परत मिळवून द्यावेत अशी मागणी केली आहे.


Spread the love