सरकारी पातळीवर होत असलेला भ्रष्टाचार कमी होण्याचे काही नाव नाव घेत नाही. औरंगाबाद येथे एका पोलिस अधिकाऱ्याला एक हजारांची लाच घेताना पकडल्यानंतर पुन्हा दुसरी एक घटना नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात उघडकीला आलेली असून गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी लाच म्हणून सहा हजार रुपये घेताना पोलीस कॉन्स्टेबलला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. गुरुवारी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात हा प्रकार घडलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, सुनील अहिरसे या अधिकार्याचे नाव असून नंदुरबार तालुका पोलीस ठाणे कलम 160 अंतर्गत चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्यावेळी तपास कामासाठी तुम्हाला मदत करेल असे आश्वासन देत पोलीस हवालदार सुनील अर्जुन अहिरसे यांनी 12 हजार रुपये लाचेची मागणी केली होती आणि तक्रारदार यांनी तडजोड करत सहा हजार रुपये देईल असे सांगितले होते.
तक्रारातील चारपैकी एका तक्रारदाराने सदर प्रकाराची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला सांगितली आणि त्यानंतर लाच मागितल्याची खात्री होताच पथकाने सुनील अहिरसे यास रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा रचला होता. पोलीस ठाणे आवारात लाच देण्याचा हा प्रकार सुरू असतानाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, पोलीस उपअधीक्षक सतीश भामरे यांच्या पथकाने विद्युत वेगाने कारवाई केली आणि सुनील अहिरसे याला अटक केली.