अवघी 13 वर्षांची मुलगी सहा महिन्यांची गर्भवती तर प्रियकर.., महाराष्ट्रातील प्रकार

Spread the love

महाराष्ट्रात एक वेगळीच घटना समोर आलेली असून अवघ्या 13 वर्षीय मुलीला दिवस गेले असून ती चक्क सहा महिन्याची गर्भवती असल्याचा प्रकार समोर आलेला आहे. सदर घटनेतील आरोपी हा देखील अवघा पंधरा वर्षाचा असून चंद्रपूर जिल्ह्यातील शंकरपूर येथील ही घटना आहे आहे. सदर घटनेमुळे समाजमन सुन्न झालेले असून समाजाची वाटचाल नक्की कुठे चालू आहे ? हा प्रश्न उभा राहिला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, चिमूर तालुक्यातील एका गावात ही मुलगी इयत्ता सातवीच्या वर्गात शिकते. दरम्यानच्या काळात तिचे 15 वर्षीय मुलासोबत प्रेमसंबंध निर्माण झाले आणि त्यातून त्यांनी प्रेमाच्या सगळ्या मर्यादा पार केल्या. वारंवार हा प्रकार घडल्याने ही मुलगी गर्भवती झाली आणि पोट दुखत आहे म्हणून आईने प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले त्यावेळी हा धक्कादायक प्रकार समोर आला.

आईने विश्वासात घेऊन तिला याबद्दल माहिती विचारली असता तिने तिच्या मित्राचे नाव सांगितले त्यानंतर या मुलाला ताब्यात घेण्यात आलेले असून त्याला बालसुधारगृहात पाठविण्यात आलेले आहे तर मुलीला रुग्णालयात भरती करण्यात आलेले आहे. सदर घटनेनंतर परिसरात देखील खळबळ उडाली असून लहान वयात मोबाइल हातात आल्यानंतर संपर्क साधने सोपे झाल्याने प्रकार वाढत असल्याचे दिसून येत आहे


Spread the love