पुण्यात एक खळबळजनक घटना समोर आलेली असून एका महिलेने संतापाच्या भरात शिवीगाळ करून पतीला जोरदार मारहाण केली आणि त्याच्या अंगावर डिझेल ओतून पेटवण्याचा देखील प्रयत्न केला. सदर प्रकार 25 जून रोजी महात्मा फुले नगर येथे घडलेला असून उमाकांत विलास तपसाळे (राहणार भोसरी ) असे फिर्यादी व्यक्तीचे नाव असून त्यांनी पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली आहे. सदर प्रकरणी पोलिसांनी एक आरोपी महिला आणि तिच्या सोबत असलेला अभिराम गायकवाड ( वय 50 राहणार बावडा चौक इंदापूर रोड ) याच्याविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, फिर्यादी यांची आरोपी ही पत्नी आहे आहे मात्र त्यांच्यात भांडण झाल्याने एक महिन्यापासून ते एकत्र राहत नाहीत. फिर्यादी कामावरून घरी जात असताना फिर्यादी यांची पत्नी आणि त्यांच्यासोबत असलेल्या गायकवाड यांनी त्यांना गाठले आणि त्यांच्या डोक्यात बिअरची बॉटल मारून जखमी केले. त्यानंतर फिर्यादी यांना खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि अंगावर डिझेल ओतत पेटवून तुला मारतो अशी देखील धमकी दिली असे फिर्यादी यांचे म्हणणे आहे. सदर प्रकरणाचा पोलिस तपास करत आहेत.