महाराष्ट्र हादरला..रात्रपाळीला गेलेला पती आला तर पत्नीला ‘ त्या ‘ अवस्थेत पाहून

Spread the love

महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून कामाला गेलेला पती घरी परतला असताना चक्क त्याची बायको ही त्याला निर्वस्त्र अवस्थेत मरून पडलेली आढळली आणि त्याला धक्काच बसला. मुंबईनजीक असणाऱ्या विरार परिसरात ही घटना घडलेली आहे .सदर महिलेचा पती हा रात्रपाळीला गेला होता तो सकाळी घरी आला तर नवविवाहित पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती तर तिच्या हाताची नस देखील कापण्यात आलेली होती

उपलब्ध माहितीनुसार , सदर दाम्पत्याचा अवघ्या एक महिन्यापूर्वीच विवाह झाला होता.प्रिया कांबळे असं हत्या झालेल्या 28 वर्षीय नवविवाहित महिलेचं नाव असून मृत महिलेच्या पतीने विरार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. प्रिया कांबळे यांची हत्या झाली की त्यांनी आत्महत्या केली, याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही.

संबंधित घटना विरारच्या कारगीलनगर परिसरातील तुळजा भवानी संकुल बिल्डिंग नंबर 6 मध्ये घडली आहे मृत महिलेच्या पतीने या घटनेची माहिती विरार पोलिसांना देताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला असून मृत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. शवविच्छेदन रिपोर्टमधून मृत्यूबद्दल आणखीन खुलासा झाल्यावरच त्यानुसार तपासाची दिशा ठरणार आहे.


Spread the love