पुण्यात काय चाललंय ? महिलेला तृतीयपंथीय व्यक्तीने चपलांचा हार घालून फिरवलं

Spread the love

पुणे शहरात एक संतापजनक प्रकार समोर आला असून समाजातील नको त्या प्रवृत्तीच्या विरोधात जनजागृती करणाऱ्या एका महिलेच्या गळ्यात चक्क चपलांचा हार घालून मारहाण करण्यात आली आहे तसेच त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून त्यांची बदनामी करण्याचे काम एका तृतीयपंथी व्यक्तीने केलेले आहे. विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात चाळीस वर्षीय महिलेने त्याच्या विरोधात फिर्याद दिलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, फिर्यादी महिला यांचे एक यूट्यूब चैनल असून त्यातून त्या समाजातील अपप्रवृत्तीच्या विरोधात जनजागृती करतात तर सदर प्रकरणी आरोपी असलेला सागर शिंदे या तृतीयपंथी व्यक्तीचा देखील एक यूट्यूब चैनल आहे आणि त्यातून तो अंधश्रद्धा पसरवत होता. फिर्यादी महिलेने हा प्रकार चित्रित करून स्वतःच्या चॅनलवर प्रसारित केला त्यानंतर सागर शिंदे याने आक्षेप घेतल्यावर फिर्यादी महिलेने वाद नको म्हणून आरोपीची माफी देखील मागितली होती.

सदर घटना घडल्यानंतर फिर्यादी महिला या 23 जून रोजी बारा वाजता चौधरीनगर येथे गेले असताना सागर शिंदे या तृतीयपंथी व्यक्तीने काही महिला आणि पुरुषांना बोलावून घेत टेरेसवर फिर्यादी महिलेला अडकवून ठेवले आणि शिवीगाळ करत चपलाने मारहाण केली तसेच फिर्यादीच्या गळ्यात चपलांचा हार घालून या प्रकाराचा व्हिडिओ युट्यूबवर प्रसारित करून फिर्यादी महिला यांची बदनामी केली आहे. सदर प्रकरणाचा पोलीस तपास सुरु आहे.


Spread the love