देश हादरला..शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवणारी निघाली सेक्स रॅकेटची ‘ मास्टरमाइंड ‘

Spread the love

देशात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असताना अशीच एक घटना मध्य प्रदेशात समोर आली असून चक्क शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवलेल्या एका महिलेच्या घरी सेक्स रॅकेट पकडण्यात आले आहे . मध्य प्रदेशातील सीहोर इथं महिलेच्या घरी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला असून पोलिसांनी घटनास्थळावरुन रोख रक्कम आणि २ कार जप्त केली आहे. सेक्स रॅकेटमध्ये ५ मुली, ५ ग्राहकांसह महिला मॅनेजर आणि चालकाला अटक करण्यात आली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, अनुपमा तिवारी असे या महिलेचे नाव असून तिने शिवसेनेच्या तिकीटावर नगरपालिकेची निवडणूकही लढवली आहे. घटनास्थळी पोलिसांना नशेचं सामानंही मिळालं असून या सर्व मुली भोपाळच्या असल्याचं सांगितलं जातं. इंदुलता नावाची महिला मॅनेजर त्यांना घेऊन येत होती आणि ग्राहक देखील आणण्यात ती व ही महिला नेता सक्रिय असल्याचे बोलले जात आहे .

अनुपमा तिवारी ही समाजसेविका असल्याचं सांगत तिने चक्क २०१५ च्या निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर नगरपालिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती. महिलांच्या सुरक्षेसाठी अनुपमा तिवारी समोर येऊन मोठी मोठी विधानं करत होती मात्र आता या सर्व खेळाचा पर्दाफाश झाला आहे. महिला मॅनेजर इंदुलता या मुलींना घेऊन रुमवर यायची आणि अनुपमा तिवारी हिच्या मार्गदर्शनाखाली हा सर्व प्रकार चालायचा.

अनुपमा मूळची होशंगाबाद येथील रहिवासी असून अनुपमा तिवारीच्या पतीचं २०१८ मध्ये निधन झालं होतं. दारुबंदीविरोधातही अनुपमा मोहिम चालवायची. २०१५ निवडणुकीत अवघे ६९४ मते तिला मिळाली होती. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहेत. ज्यात आणखी खुलासा होण्याची शक्यता वर्तवली जात असून आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता असल्याचं पोलिसांनी सांगितले आहे.


Spread the love