क्रूरतेच्या मर्यादा ओलांडणारे एक धक्कादायक प्रकरण सध्या चर्चेत असून पाकिस्तान येथे ही घटना उघडकीला आलेली आहे. पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील कराची परिसरात पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह या नराधम पतीने उकळल्याचा प्रकार समोर आलेला आहे. पाकिस्तानची आर्थिक राजधानी असलेली कराची येथील गुलशन ए इक्बाल नावाच्या परिसरात हा प्रकार उघड झाला आहे .
उपलब्ध माहितीनुसार, आशिक असे आरोपीचे नाव असून तो एका शाळेवर सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करायचा मात्र शाळा गेल्या नऊ महिन्यांपासून बंद होती . शाळेच्या कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या निवासस्थानामध्ये तो त्याची पत्नी नरगीस आणि सहा मुलांसोबत राहत होता. त्यांच्यात झालेल्या भांडणानंतर त्याने पत्नीचा उशीने तोंड दाबून खून केला आणि त्यानंतर शाळेच्या स्वयंपाकघरातील कढईत तिचा मृतदेह आढळला. धक्कादायक म्हणजे त्याने त्याच्या मुलांच्यासमोरच हा प्रकार केला आणि त्यानंतर तीन मुलांना घेऊन तो फरार झाला.
राहिलेल्या तीन मुलांपैकी एका 15 वर्षीय मुलीने हा प्रकार पाहिल्याने पोलिसांना फोन करून झालेल्या प्रकाराची माहिती दिली त्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा तेथील दृश्य पाहून पोलीस देखील हादरून गेले. एखादा माणूस इतका क्रूर कसे वागू शकतो ? हा प्रश्न त्यांना पडला. पोलिसांनी तात्काळ त्याच्या अटकेसाठी शोधमोहीम हाती घेतली. त्याच्यासोबत असलेली तीन मुले ही देखील अत्यंत घाबरलेली होती असेही पोलिसांनी सांगितले आहे .