अल्पवयीन मुलांना सध्या मोबाईल आणि कॉम्प्युटर लॅपटॉप याचे इतके वेड लागलेले आहे की ते मिळवण्यासाठी कुठल्याही थराला मुले जाऊ शकतात असे चित्र आहे. अशीच एक घटना मुंबई येथे समोर आलेली असून संगणक आणि महागडा मोबाईल विकत घ्यायचा या नादापायी जोगेश्वरी येथील एका अल्पवयीन मुलाने चक्क बॉम्ब बनवला आणि तो कुरियर केला. काही तासात तो बॉम्ब फुटला देखील मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. कुरिअर पार्सल जर खराब झाले तर विम्याचे पैसे मिळतात आणि हे पैसे मिळाल्यानंतर आपण संगणक आणि मोबाईल घेऊअसे त्याचे स्वप्न होते त्यातून त्याने हा प्रयोग केल्याचे समजते.
अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याने यूट्यूबच्या माध्यमातून काही व्हिडिओ पाहून आपण हा प्रकार केलेला आहे असे सांगितले. पोलिसांनी त्यानंतर जिथे हा बॉम्ब फुटला होता तिथे भेट दिली असताना फटाके, एक मोबाईल बॅटरी आणि इलेक्ट्रिक सर्किट हे तिथे आढळून आले आणि त्यांनी या प्रकरणी जोगेश्वरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला हे पार्सल कुठून आले याचा शोध घेतले असता पोलिस या अल्पवयीन मुलापर्यंत पोहोचले.
मुलांने सांगितल्याप्रमाणे त्याने एका विमा कंपनीची ऑनलाइन जाहिरात पाहिली होती त्यामध्ये जर एखादी वस्तू पाठवताना खराब झाली तर विमा कंपनी त्याच्या मालकाला मूळ किंमत आणि अतिरिक्त शंभर टक्के भरपाई देते अशी ती जाहिरात होती त्यामुळे आपण पाठवलेले कुरियर खराब करायचे आणि त्यातून कंपनीकडे विमा क्लेम करत पैसे मिळवायचे असा त्याचा यामागील उद्देश होता. फोनवर अलार्म वाजला बॉम्बचा स्फोट होईल अशा पद्धतीने त्याने या बॉम्बची सेटिंग केली होती आणि बनावट बिल तयार करुन ते बॉक्स मध्ये ठेवले होते. त्याचा हा कारनामा पाहुन पोलीस देखील थक्क झाले.