कोरोना संकटानंतर नागरिकांचे अर्थचक्र बऱ्याच अंशी बिघडलेले असून त्यातून ऑनलाइन कर्ज प्रकरणाने राज्यात धुमाकूळ घातलेला आहे. अत्यंत कमी कागदपत्रे असे वर्णन करत या कंपन्यांकडून ॲपच्या माध्यमातून मोबाईलचा पूर्ण डाटा घेतला जातो आणि त्यातून व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्ती आणि फोटो गॅलरी याच्यातून फोटो चोरून मॉर्फ करून ब्लॅकमेलिंगचे देखील प्रकार सुरू झालेले आहेत.अशीच एक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे उघडकीला आली असून एका युवतीला वेगवेगळ्या क्रमांकावरून व्हाट्सअपवर अश्लील मेसेज केल्याचा प्रकार समोर आला आणि अखेर या प्रकरणी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, सदर युवतीने ॲप लोन नावाच्या एका ॲपवरून ऑनलाइन कर्ज घेतले होते त्यावेळी तिने बऱ्याच अंशी वैयक्तिक माहिती सबमिट केली आणि काही कालावधीनंतर तिने कर्जाचा देखील भरणा केला मात्र भरणा केल्यानंतर देखील तिच्या व्हाट्सअपवर वेगवेगळ्या 15 मोबाइल क्रमांकावरून अश्लील एसएमएस व्हिडिओ पाठवण्यात आल्यात आलेले असून तिला घाणेरड्या शब्दात शिवीगाळ देखील केली जात आहे. ‘ तू कोण आणि कशी आहेस हे आम्हाला चांगले माहीत आहे ‘ असे म्हणत तिला धमकावण्यात देखील येत आहे.
कर्जाचा भरणा केलेला असताना देखील अशा पद्धतीने होत असलेल्या मानसिक त्रासाला वैतागून अखेर तिने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली त्यानुसार पोलिसांनी अनोळखी इसमाच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियम 208 कलम 67 नुसार तब्बल पंधरा मोबाईल धारकांवर गुन्हा नोंदविला आहे.