बांगलादेशमधून नोकरीच्या आमिषाने आणलं अन सांगलीत येताच चक्क..

Spread the love

महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना सांगली येथे समोर आली असून बांगलादेश इथून नोकरीचे आमिष दाखवून आणलेल्या एका महिलेला वेश्याव्यवसायासाठी म्हणून चाळीस हजार रुपयांत विकण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. पीडित महिलेला जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करणे यास आरोपींनी भाग पाडले आहे.

पीडित महिलेने विश्रामबाग पोलिस ठाण्यात दाखल होऊन तक्रार दिली असून त्यानुसार संशयित राधा नावाची महिला ( राहणार शेरेहाट जिल्हा नारायणगंज बांगलादेश ) तसेच राजू आणि आणि कालू या दोन व्यक्ती यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. महिलेने म्हटले आहे की संशयित राधा नावाच्या महिलेने तिला मेडिकल क्षेत्रात नोकरी देण्याचे आमिष दाखवले होते त्यानंतर तीस हजार रुपये पगार मिळेल असे देखील ती म्हणाली आणि त्यानंतर आपण कोणतेही कागदपत्रे न घेता भारतात प्रवेश केला होता.

गोकुळ नगर येथे आपल्याला आणण्यात आल्यावर 40 हजार रुपयांना आपली विक्री करण्यात आली आणि त्यानंतर राधा नावाची महिला आणि राजू आणि कालू या दोन व्यक्तींनी आपल्यावर वेश्या व्यवसाय करण्यासाठी दबाव टाकला असेही म्हटलेले आहे. सदर प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.


Spread the love