अमानुषतेचा कळस..पाळीव कुत्र्यासोबत अत्यंत संतापजनक कृत्य

Spread the love

महाराष्ट्रात एक संतापजनक प्रकार समोर आला असून माणुसकीला लाजवेल असे कृत्य बल्लारपूर तालुक्यातील दहेली या गावात घडलेले आहे. एका निष्पाप पाळीव कुत्र्याच्या पायाला मोठा दगड बांधण्यात आला आणि त्यानंतर त्याला नदीमध्ये फेकून देण्यात आले. सदर घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झालेला असून अशा व्यक्तींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

बल्लारपूर तालुक्यातील दहेली गावात काही युवकांनी हा संतापजनक प्रकार केलेला असून चार जणांनी प्रथम कुत्र्याच्या पायाला दगड बांधला आणि त्यानंतर मानेला फास आवळून त्याला नदीच्या पात्रात फेकून दिले मात्र जिवाच्या आकांताने मोठ्या प्रयत्नाने हा कुत्रा पुन्हा नदीतून बाहेर आला. पाळीव कुत्रा असल्याने तो पुन्हा या युवकाजवळ आला मात्र त्यांनी पुन्हा एकदा त्याचे पाय बांधून एक मोठा दगड त्याला बांधून नदीमध्ये फेकून दिले त्यानंतर मात्र त्याचा मृत्यू झाला.

सदर घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच संताप व्यक्त केला जात आहे. पशूमध्ये माणसाचा सर्वात जवळचा पाणी म्हणून कुत्र्याची ओळख आहे. आपल्या मालकासाठी कुत्र्यांनी स्वतःच्या जीवावर उदार होऊन अनेकदा मालकाचे प्राण वाचवले अशा देखील कित्येक घटना उघडकीला आलेल्या आहेत असे असताना एका निष्पाप जीवाला अशा पद्धतीने ठार मारण्याचा प्रकार अत्यंत संतापजनक असून या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी सोशल मीडियावर केली जात आहे.


Spread the love