अभिनेत्री आणि इंटरनेट सेन्सेशन पूनम पांडे हिने आपल्या पतीनं मारहाण केल्याची तक्रार पोलिसात दाखल केल्यानंतर पोलिसांनी तिचा पती सॅम बॉम्बे याला अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी सांगितले की, पूनमचे डोके, डोळे आणि चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या आहेत. पूनमच्या तक्रारीवरून सॅमविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बॉयफ्रेंड सॅम बॉम्बेसोबत 11 सप्टेंबरला पूनमने लग्न केले होते. पूनम आणि सॅम या दोघांनी लग्न समारंभातील फोटो आपापल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले होते .पूनम पांडे लग्नानंतर अवघ्या दहा दिवसातच पोलीस स्टेशनला पतीच्या विरोधात विनयभंगाची तक्रार घेऊन आली होती. गोवा इथे हा प्रकार घडला होता. पोलिसांनी दिग्दर्शक सॅम बॉम्बे याला अटक केली मात्र त्याची जामिनावर सुटकाही झाली. त्यानंतर दोघांनी आपल्यातील वाद मिटवत पुन्हा घरोबा केला.
46 वर्षीय सॅम अहमद बॉम्बे हा चित्रपट दिग्दर्शक आहे. तर पूनम पांडेने काही चित्रपट आणि म्युझिक व्हिडीओमध्ये काम केले आहे. मॉडेल पूनम पांडे सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. बर्याचदा हॉट फोटो आणि व्हिडिओंमुळे ती चर्चेत राहण्याचा प्रयत्न करते. सोशल मीडियावर तिचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे.