देशात खळबळ उडवून देणाऱ्या भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबे आत्महत्या प्रकरणात रोज नवनवीन घडामोडी समोर येत असून वाराणसी येथील एका हॉटेलमध्ये तिचा मृतदेह आढळून आलेला होता. तिने आत्महत्या केल्याचे सांगितले जात असले तरी याप्रकरणी चौकशी सुरू असून आकांक्षांच्या कुटुंबीयांनी या प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी केलेली आहे.
अभिनेत्री आकांक्षा दुबे हिच्या कपड्यांची तपासणी करण्यात आली त्यामध्ये तिच्या अंतर्वस्रामध्ये वीर्य आढळून आलेले आहे . सदर धक्कादायक अहवाल समोर आल्यानंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेले समर सिंह आणि संदीप सिंह यांच्यासोबत इतर चार जणांची आता डीएनए चाचणी केली जाणार आहे. पोलिसांनी न्यायालयाकडे त्यांच्या डीएनए चाचणीसाठी परवानगी मागितलेली आहे.
आकांक्षा दुबे प्रकरणातील आरोपी समर सिंह , संदीप सिंह , आणि अरुण पांडे या तिघांचे डीएनए नमुने पोलीस घेणार असून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सध्या समर सिंह आणि संदीप सिंह हे तुरुंगात आहेत. आकांक्षा ही सर्वात शेवटी संदीप सिंह याच्यासोबत दिसलेली होती .
समर सिंह या प्रकरणातील कथित मुख्य आरोपी असून उत्तर प्रदेश पोलिसांवर आपला विश्वास नसल्यामुळे याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आलेली आहे. आकांक्षा हिच्या कुटुंबीयांच्या मते तिची हत्या करण्यात आलेली असून 25 वर्षांची अभिनेत्री 26 मार्च रोजी पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आलेली होती.