उर्फी जावेदच्या चाहत्यांसाठी ‘ आनंदाची बातमी ‘, उर्फीने म्हटलंय की..

Spread the love

सोशल मीडिया स्टाइल आयकॉन असलेली उर्फी जावेद पुन्हा एकदा चर्चेत आलेली असून इंस्टाग्रामने तिचे खाते काही दिवसांपूर्वीच बंद केलेले होते . कम्युनिटी गाईडलाईनचे उर्फी पालन करत नाही असा मेसेज तिच्या अकाउंटवर चाहत्यांना दिसून येत होता त्यानंतर तिने या संदर्भात अपील केल्यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने आपली चूक मान्य केली आणि पुन्हा तिचे खाते सक्रिय केलेले आहे.

उर्फी जावेदने मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर केलेला असून स्क्रीनशॉट मध्ये तिने म्हटले आहे की , ‘ instagram ची समुदाय मार्गदर्शक तत्त्वे न पाळल्यामुळे माझे खाते बंद करण्यात आलेले होते ते पुन्हा सुरू करण्यात आलेले आहे. आपल्या बिंदास आणि बोल्ड फॅशन साठी ओळखली जाणारी उर्फी जावेद सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत असून भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यासोबत तिचा वाद चांगलाच रंगला होता.


Spread the love