पुणे जिल्ह्यात एक वेगळाच प्रकार समोर आलेला असून आपल्या प्रेयसीवर इंप्रेशन मारण्यासाठी तिची हौस मौज पूर्ण करण्यासाठी तिच्या प्रियकराने तब्बल पंधरा गाड्या चोरल्या मात्रा अखेर त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. निगडी पोलिसांनी ही कारवाई केली असून यश किरण सोळसे ( वय 20 राहणार एमआयडीसी रोड तळेगाव दाभाडे ) असे त्याचे नाव आहे.
उपलब्ध माहितीनुसार, निगडी पोलीस परिसरात गस्त घालत असताना एक चार चाकी वाहन त्यांना संशयितरित्या आढळून आले त्यावेळी चारचाकी चालवणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने ही चार चाकी निगडी प्राधिकरण येथून चोरी केले असल्याचे समोर आले त्यानंतर त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यावर त्याने तब्बल 13 चोरीच्या मोटारसायकल आणि दोन चारचाकी गाड्या इतकी चोरी केल्या आहेत अशी कबुली दिली.
पोलिसांनी त्याला चोरीचे कारण विचारता त्याने आपल्या प्रेयसीला रोज नवनवीन गाड्यात फिरवता यावे म्हणून आपण हा प्रकार केलेला आहे असेही तो म्हणाला. त्याचे हे कार्य ऐकून पोलिसही अचंबित झाले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ मुंडे, पोलीस निरीक्षक विश्वजीत खुळे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे