महाराष्ट्रात एक वेगळी घटना समोर आलेली असून अभ्यासाचा कंटाळा आल्यानंतर शाळेत न जाता इयत्ता नववीमधील एका विद्यार्थ्याने स्वतःचेच अपहरण झाल्याचा बनाव घडवून आणला मात्र या प्रकरणात पोलिसांची देखील चांगलीच दमछाक झाली. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे ही घटना उघडकीला आलेली आहे.
बल्लारपूर येथील एक इयत्ता नववीमधील शिकलेला विद्यार्थी गायब झाल्यानंतर आपल्या मुलाचे कोणीतरी अपहरण केले अशी तक्रार दीनदयाळ वार्ड येथे राहणाऱ्या एका कुटुंबाने केली होती त्यानंतर पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी सदर प्रकरणी अनेक जणांची चौकशी केली आणि सीसीटीव्ही कॅमेरे यांच्या माध्यमातून देखील तपास सुरू केला मात्र अपहरण झाल्याचे कुठेच दिसून आले नाही शेवटी त्यांनी या मुलाला विश्वासात घेऊन विचारले त्यावेळी त्याने यामागचे कारण सांगितल्यावर पोलीस देखील चकित झाले.
मुलगा म्हणाला की अभ्यासाचा कंटाळा आला म्हणून मी कारवा जंगलात निघून गेलो होतो मात्र मला तिथून काही लोकांनी हटकले आणि पुन्हा गावात आणून सोडले. त्यानंतर मी माझा विचार बदलला आणि घरी आलो मात्र आई-वडील रागावतील म्हणून आपण मार चूकवण्यासाठी अपहरण केल्याची खोटी माहिती दिली. अभ्यासाचे खूप टेन्शन आल्यामुळे आपण हा प्रकार केला, असेही तो पुढे म्हणाला .